खारेगाव खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात कळवा वाहतूक शाखेच्या पोलीसांना यश

खारेगाव खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात कळवा वाहतूक शाखेच्या पोलीसांना यश आलं आहे. काल संध्याकाळच्या सुमारास ताराचंद भारती या ३१ वर्षीय व्यक्तीने खारेगाव खाडी ब्रीजवरून पाण्यात उडी मारली. यावेळी कळवा वाहतूक शाखेचे बीट मार्शल वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी त्यांना ही माहिती कळल्यानंतर तेथील अंमलदार आणि दोन्ही बीट मार्शल यांनी तिथे उपलब्ध असलेल्या बोटीने तात्काळ पाण्यात उडी मारलेल्या व्यक्तीजवळ जाऊन बोट मधील दोन स्थानिक रहिवाशांनी पाण्यात उडी मारून त्याला बुडताना पाण्यातून बाहेर काढून बोटीवर घेतले. त्यावेळी दमलेल्या अवस्थेत असलेल्या ताराचंद भारती यांनी कौटुंबिक कारणामुळे पाण्यात उडी मारल्याचे सांगितले. ताराचंद भारती हे मानकोलीचे रहिवासी आहेत. यावेळी पोलीस हवालदार संजय पाटील, पोलीस शिपाई परसराम शेळके, पोलीस शिपाई अमृत पाटील, विशाल ढाकणे यांनी स्थानिक बोटीवरील व्यक्तींच्या मदतीने ताराचंद भारती यांचे प्राण वाचविले. नंतर त्यांना नारपोली पोलीसांकडे त्यांना सुपुर्द करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading