ठाण्यामध्ये आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन साप पकडले.

ठाण्यामध्ये आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन साप पकडण्यात आले. एक घोणस जातीचा तर दुसरा मांडूळ जातीचा होता. हा साप विषारी समजला जातो एका खाजगी कंपनीत हा साप मिळाला. सर्पमित्र पराग शिंदे यांनी त्याला पकडून त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली जाणार आहे. दुसरा मांडूळ जातीचा साप इंदिरानगर मधील झोपडपट्टीत दिसला. अमन सिंग हा साप पकडला. हा दुतोंड्या म्हणूनही ओळखला जातो हा साप आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोट्यावधी रुपये असल्याचं बोललं जातं मात्र प्रत्यक्षात हे चुकीच असल्याचं अमन सिंग यांनी सांगितलं. या सापाला एकच तोंड असतं दुसऱ्या बाजूला शेपटी असते पण ही तोंडा सारखी दिसल्यामुळे हिला दोन तोंड असतात असं म्हणतात हे दोन्ही साप साधारणतः साडेचार फुटाचे आहेत. आता या मांडूळलाही नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading