अवैध रेती उत्खनन प्रकरणी कारवाईत ५० लाखांचा मुद्देमाल नष्ट

मुंब्रा, कोपर आणि भिवंडी लगतच्या खाडीमध्ये गस्तीवर असलेल्या ठाणे आणि भिवंडी तहसील कार्यालयाच्या पथकाने अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या 2 सक्शन पंप आणि 2 बार्जवर धडक कारवाई करुन या सक्शन पंप आणि बार्ज यांच्या इंजिनमध्ये साखर टाकून नष्ट करत पाण्यामध्ये बुडविले. तसेच खाडी लगत असलेल्या रेती साठ्यासह 3 कुंड्या नष्ट करण्याची कारवाई केली. या कारवाईमध्ये अंदाजे 50 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अनधिकृत रेती उत्खननावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत धडक कारवाई करण्यात येत असून गेल्या तीन आठवड्यामध्ये आठ कारवाया केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने 01 एप्रिल 2022 ते 13 फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यांतर्गत अनधिकृत गौण खनिज वाहनांच्या तपासणी मोहिमेदरम्यान 11,307 वाहनांची तपासणी केली असून आजपर्यंत एकूण 205 वाहनांवर दंडनीय कारवाई केली आहे

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading