नर्सिंगच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींची राजेश मढवी यांनी त्वरीत केली राहण्याची व्यवस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिव्हील हॉस्पीटल येथे जिल्ह्यातील विविध भागातून नर्सिंग कोर्सची परिक्षा देण्यासाठी विद्यार्थी आले आहेत. यामध्ये तलासरी येथिल आदिवासी दुर्गम भागातूनही ३० हुन अधिक विद्यार्थिनी आल्या आहेत.या सर्व मुलींची राहण्याची जेवणा-खाण्याची व्यवस्था कुठेच होत नव्हती याबाबत समाजसेवक राजेश मढवी यांना माहीती मिळताच त्यांनी त्वरीत या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था नजिकच्या निवारा केंद्रात केली. तसेच त्यांची संपूर्ण जेवणखाण चहापान याचीही व्यवस्था करण्याबरोबरच तसंच त्या सर्व मुलींची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी या विद्यार्थ्यांकडून एक छोटासा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading