नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पुतळ्याची खासदार राजन विचारे यांच्याकडून पाहणी

बाजीराव पेशवे यांचे धाकटे पेशवे नरवीर चिमाजी आप्पा यांचा पुतळा उत्तन चौकात बसविण्यात आला आहे. गेली 20 वर्षे हा पुतळा मंजुरीच्या प्रक्रियेत अडकला होता. या पुतळ्यासाठी खासदार राजन विचारे यांनी आपल्या निधीतून २५ लाख रूपये दिले आहेत. या पुतळ्याच्या पाहणी दरम्यान मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांना स्मारकाच्या ठिकाणी जुन्या दगडांचे अवशेष आहेत त्याचे पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने जतन करा अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच संपूर्ण स्मारकाला संरक्षण देण्यात यावे. त्याचबरोबर या स्मारकाहून वसईचा किल्ला समुद्रातून दिसण्यासाठी वाढलेल्या वृक्षांची छाटणी करावी. तसेच नव्याने आलेले वृक्ष यांचे पुनर्रोपण दुसरीकडे करण्यात यावे. पुतळ्याच्या देखभालीसाठी हायड्रोलिक यंत्रणा उभारून या ठिकाणी हायमास्ट आणि विद्युत रोषणाई करण्यात यावी अशा सूचना केल्या. वसईचा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना सागरी किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. त्याच बाजीराव पेशव्यांनी ती जबाबदारी धाकटे पेशवे नरवीर चिमाजी आप्पा यांच्यावर सोपवली आणि वसईचा किल्ला जिंकला. अशा थोर पुरुषाचे स्मारक समुद्रकिनारी वसई किल्ल्यावर नजर असलेला भव्य पुतळा मौजे चौक येथे उभारण्याची स्थानिक नागरिकांची मागणी होती. हा पुतळा उभारण्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading