जिल्ह्यात आज कोरोनाचे १८९ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १८९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३७ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ७८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ७६ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ७२६ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३८ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८८४ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १५ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३६० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर आत्तापर्यंत ६१२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७३ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये २ नवे रूग्ण, ३ मृत्यू तर आत्तापर्यंत ५४५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३६६ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ४ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २१२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading