नजीब मुल्ला यांचा समर्थकांसह ठाणे महापालिका पक्ष कार्यालयात प्रवेश

ठाण्यातील महापालिका पक्ष कार्यलयावर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि माजी गटनेते नजीब मुल्ला यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका पक्ष कार्यालयात प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी मुल्ला यांचे स्वागत केले. अधिकृत राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांकडे असल्याने साहजिकच या कार्यलयात आम्ही येणारच ही महापालिकेची मालमत्ता आहे, कोणीही येऊ शकतो कार्यकर्त्यांना भेटू शकतो. त्यामुळे आम्ही इथे आलो ठाणे शहर कार्यालय हे जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता होती. आम्ही ठाणे शहरात पक्षाचं कार्यालय उभारणार असून अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी मोठ्या थाटामाटात त्याचं उदघाटन होणार असल्याची माहिती मुल्ला यांनी दिली. यावेळी मुंब्रा विकास आघाडीचे संस्थापक आणि आव्हाडांचे कट्टर विरोधक माजी नगरसेवक राजन कीणे यांनीही मुल्ला यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केलं त्यामुळे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ नजीब मुल्ला यांची राष्ट्रवादी तर्फे 2024 साली जोरदार दावेदारी असल्याची एकच चर्चा निर्माण झाली आहे. याबाबत बोलताना पक्षाने आपल्याला आदेश दिला तर कुठूनही निवडणूक लढायला तयार आहोत. मुंब्रा विकास आघाडीचे नगरसेवक आपल्याला भेटून गेलेत त्याठिकाणी मतदारसंघाला आपली मक्तेदारी समजून सर्व चालतात तेथील आर्थिक फायद्यासाठी लोकप्रतिनिधीचा वापर करतात असे काहीजण आम्ही पहिले आहेत. त्यामुळे त्या विरोधात ही मुंब्रा विकास आघाडी निर्माण झाली असून आपणही त्यांच्यासोबतच असल्याचे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading