मानपाडा येथील एका चाळीचा काही भाग पडला

मानपाडा येथील एका चाळीचा काही भाग पडला. सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. काल रात्रीच्या सुमारास चितळसर मानपाडा येथील अष्टविनायक या तळ अधिक एक मजली चाळीच्या गॅलरीचा काही भाग पडला असून उर्वरीत भाग धोकादायक स्थितीत आहे. ही चाळ ३५ ते ४० वर्ष जुनी आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि महापालिकेच्या कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन चाळीच्या बाजुच्या रस्त्यावर पडलेला गॅलरीचा भाग काढून रस्ता रहदारीकरिता मोकळा केला आहे. या चाळीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असून सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून धोकापट्टी बांधून चाळीतील ७ रहिवाशांना तात्पुरत्या स्वरुपात शेजारच्या चाळीत स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading