नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या हरित कट्ट्याचं लोकार्पण

नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून निर्माण करण्यात आलेल्या हरित कट्ट्याचं आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. शिवाईनगर परिसरातील नागरिकांच्या विनंतीनुसार मोकळ्या जागी परिसरातील ज्येष्ठ तसंच मार्केटमधून ये-जा करणा-या नागरिकांना बसण्याकरिता प्रसन्न आणि आनंददायी अशा हरित कट्ट्याची संकल्पना परिषा सरनाईक यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना येऊर किंवा उपवनच्या सान्निध्यात जाता येत नाही त्यांना आता या हरित कट्ट्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचं जाणवत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading