एसआरए योजनेअंतर्गत ठाण्यात देण्यात येणारी घरं ३०० चौरस फूटाची देण्यात यावीत अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकीत प्रश्नोत्तराच्या वेळी आमदार रविंद्र फाटक यांनी केली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही तात्काळ ही मागणी मान्य करत आत्तापर्यंत आलेल्या १९ आणि यापुढील सर्व प्रकल्पांना २६९ चौरस फूटाऐवजी ३०० चौरस फूटाची घरं दिली जातील अशी घोषणा सभागृहात केली.