ठाण्यात गेल्या २४ तासात १२४ मिलीमीटर पावसाची नोंद

गेले दोन दिवस ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं असून आजही पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तास ठाण्यात १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत ६९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी आत्तापर्यंत १२३ मिलीमीटर पाऊस झाला होता. उपवन तलावाजवळील महापौर बंगल्याच्या आवारातील एक वृक्ष आज कोसळला. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत धाव घेऊन मदतकार्य केलं. ठाण्यात एकूण ९ ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडल्या तर ५ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या तर १० वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत. कंपाऊंड वॉल पडण्याच्या २ घटना घडल्या. यावर्षीची जून महिन्याची सरासरी पावसानं आत्ताच पूर्ण केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading