नगरसेवक नारायण पवार यांचा भारतीय जनता पक्षाच्या गटनेते पदाचा राजीनामा

नगरसेवक नारायण पवार यांनी भारतीय जनता पक्षाचं गटनेते पद सोडलं आहे. आपल्या विरोधात खंडणीचे खोटे आरोप उकरून काढण्यात आले आहेत. या आरोपांमुळे आपण व्यथित झालो असून नैतिक मूल्य म्हणून महापालिकेतील गटनेते पदाचा राजीनामा देत असल्याचं नारायण पवार यांनी म्हटलं आहे. आपल्या विरोधात २००८ मध्ये खोटी तक्रार करण्यात आली होती. हे प्रकरण कालबाह्य झालं होतं. मात्र राजकीय कारकिर्दीत अडथळा आणण्यासाठी ते नाहक उकरून काढण्यात आल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला आहे. आपण पुढील काळात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहू असं नारायण पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading