नगरसेवक गणेश कांबळे यांचा फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न – पोलीसांकडून तक्रार नोंदवायला टोलवाटोलवी

कळव्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. मात्र कळवा पोलीसांनी तक्रार नोंदवायला टोलवाटोलवी केल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक कलहाचे प्रकार सुरूच असून कथित पत्नीच्या जाचाला कंटाळून गणेश कांबळे यांनी किटकनाशक प्राशन करीत आत्महत्या करीत असल्याचे चित्रण थेट फेसबुकवरून लाईव्ह केले. तरीही सायंकाळपर्यत कळवा पोलिसांना पत्ताच नव्हता किंबहुना आजही गुन्हा दाखल करण्यात पोलिसांकडून दफ्तरदिरंगाई सुरूच होती. याबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी कळवा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक विजय दरेकर यांना वारंवार फोन तसेच लघुसंदेशाद्वारे संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी देखील वरिष्ठ निरिक्षकांकडे अंगुलीनिर्देश केल्याने पोलिसांच्या या टोलवाटोलवीबाबत ठाण्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
सदयस्थितीत कांबळे यांच्यावर ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. दरम्यान, फेसबुक लाईव्ह करताना कांबळे यांनी, आपल्या कथित पत्नीबाबत तक्रारींचा पाढा वाचुन तिच्याकडून वारंवार सुरू असलेल्या जाचामुळेच हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. विवाह न करताही पत्नीचा दर्जा दिला मात्र,आपल्या वाटयाला उपेक्षा आली. तिच्यामुळे वारंवार पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागल्यानंतर केवळ महिला म्हणुन तिला वेगळा न्याय आणि आपणास अपराधी केले जात असल्याने आयुष्य संपवण्याचा निर्धार केल्याचे कांबळे यानी म्हटले आहे. याआधीही अशाच वादामुळे कांबळे यांना मनस्तापाला सामोरे जावे होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading