दुकानात मद्यविक्री – तिघांविरोधात गुन्हा दाखल

जिल्हा प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवुन ठाण्यातील कासारवडवली भागात दुकानात मद्यविक्री करणा-या तिघांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५७ विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
लॉकडाऊन असल्याने तब्बल दोन महिन्यांपासून जिल्ह्यात मद्यविक्री बंद होती. तळीरामांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात ऑनलाईन घरपोच मद्यविक्रीला परवानगी दिली. तरीही कासारवडवली नाका येथील एका मद्य दुकानाच्या बाहेरील बाजुस छुप्या पद्धतीने मद्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी दुकानाचा व्यवस्थापक सुदीप सिंग याच्यासह कामगार अविनाश सिंग आणि रॉबिन्सन डिसोजा हे तिघेजण मद्याविक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून मद्याच्या ५७ बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading