दैनंदिन ठेव योजनेतील खात्यावर जमा रक्कम खातेदाराऐवजी त्याच्या व्यावसायिक भागीदाराला अदा केल्यानं खळबळ

दैनंदिन ठेव योजनेतील खात्यावर जमा रक्कम खातेदाराऐवजी त्याच्या व्यावसायिक भागीदाराला अदा केल्यानं खळबळ उडाली आहे. हा प्रकार ठाणे पूर्वकडील संतकृपा नागरी सहकारी पतसंस्थेत घडला. याप्रकरणी खातेदार संजय मिश्रा यांच्या तक्रारीवरून कोपरी पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह रक्कमेचा अपहार करणा-या व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात बार अँड रेस्टॉरंट चालवणा-या मिश्रा यांचे भगवान पवार हे व्यावसायिक भागीदार आहेत. पवार यांच्या परिचयातील संतकृपा पतसंस्थेचे व्यवस्थापक अशोक घाडगे यांच्याकडे मिश्रा यांनी मे २०१९ पासून दैनंदिन ठेव योजनेत दररोज एक हजार रूपये गुंतवले होते. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत खात्यात ९० हजार जमा झाल्याने २६ फेब्रुवारी रोजी मिश्रा रक्कम काढण्यासाठी पतसंस्थेत गेले तेव्हा व्यवस्थापक घाडगे यांनी २ जानेवारीला भगवान पवार यांना ९० हजारांची रक्कम खात्यातून काढल्याची माहिती देत त्यांना विथड्रावल स्लीप दाखवली. पण खातेदाराची सही नसताना त्रयस्थाला रक्कम दिली कशी असा जाब मिश्रा यांनी विचारला असता घाडगे यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. तर भागीदार पवार यांनीही दुरूत्तरं केल्यानं मिश्रा यांनी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading