मुरबाड येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनास मोठा प्रतिसाद लाभला. २ हजाराहून अधिक लोकांनी या प्रदर्शनास भेट दिली. या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या जातीचे गायी, बैल, घोडे यांचे १०० स्टॉल्स होते. तर वेगवेगळ्या जातीच्या १७ श्वानांच्या भव्य डॉग शोनं प्रेक्षकांची मनं जिंकली. यावेळी गुणवंत अधिकारी आणि उत्कृष्ट पशुपालक यांचा सन्मान करण्यात आला.