दारू पिऊन नाचगाण्यांचा धिंगाणा घालत नववर्ष साजरं करण्याऐवजी रक्तदान करून नववर्षाचं स्वागत करण्याचा शिवसेनेचा पायंडा

दारू पिऊन नाचगाण्यांचा धिंगाणा घालत नववर्ष साजरं करण्याऐवजी रक्तदान करून नववर्षाचं स्वागत करण्याचा पायंडा शिवसेनेनं घातला आहे. शिवसेनेच्या जिल्हा शाखेतर्फे ३१ डिसेंबरला मध्यरात्री रक्तदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी २४ वर्षापूर्वी या स्तुत्य उपक्रमाची सुरूवात केली. ३१ डिसेंबरला शहापूर, वाडा, नाशिक, नगर, धुळे, पनवेल, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि अकोला येथे रक्तदान शिबीराचं आयोजन केलं जातं. शिवसेनेच्या जिल्हा शाखेतर्फे छत्रपती शिवाजी मैदानावर रक्तानंद या संस्थेतर्फे रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या २३ वर्षात २५ हजाराहून अधिक रक्त बाटल्यांचं संकलन या शिबीराच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. या शिबीराच्या दरम्यान २५ हून अधिक वेळा रक्तदान करणा-या रक्तदात्यांचा रक्तकर्ण पुरस्कारानं गौरव केला जातो. यंदा पालघर जिल्ह्यातील ५१ वेळा रक्तदान करणा-या वैशाली चव्हाण, ठाण्याचे ४८ वेळा रक्तदान करणारे दत्ताराम गवस, कल्याणमधील २८ वेळा रक्तदान करणारे गणेश तरे आणि वाडा तालुक्यातील २५ वेळा रक्तदान करणा-या प्रभाकर भेरे यांचा गौरव केला जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading