दारूच्या नशेमध्ये वाहनं जाळणा-याला कासारवडवली पोलीसांनी अवघ्या ६ तासामध्ये केलं जेरबंद

दारूच्या नशेमध्ये वाघबीळ येथील वाहनं जाळणा-या महम्मद सय्यद याला कासारवडवली पोलीसांनी अवघ्या ६ तासामध्ये जेरबंद केलं आहे. वाघबीळ येथील प्रमोद तायडे हे मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास आपली दुचाकी वाघबीळ उड्डाणपूलाखाली ठेवून कामावर गेले होते. दुपारी ते कामावरून परत आले असता त्यांच्या दुचाकीसह आजूबाजूच्या अन्य दोन दुचाकींनाही आगी लावल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याप्रकरणी त्यांनी कासारवडवली पोलीसांकडे तक्रार दाखल केली. कासारवडवली पोलीसांनी केलेल्या चौकशीत सय्यदचं नाव समोर आलं. सय्यद हा कामाच्या शोधार्थ अलिकडेच उत्तरप्रदेशातून ठाण्यात आला होता. वाघबीळ उड्डाणपूलाखाली तो बसलेला असताना एका दुचाकीतून पेट्रोल जळत असल्याचं त्याला दिसल्यानं त्यानं काडी पेटवून त्या पेट्रोलवर टाकली. त्यामुळं त्या दुचाकीसोबत आजूबाजूच्या दोन दुचाकींनीही पेट घेतला. दारूच्या नशेत आपण हे कृत्य केल्याची कबुली सय्यदनं दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading