राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला काल संध्याकाळच्या सुमारास आग

राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला काल संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. राज्य परिवहन महामंडळाची ठाणे ते अर्नाळा या शिवशाही बसला काल संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास आग लागली होती. जिल्हा रूग्णालयाजवळ या बसला ही आग लागली होती. या बसच्या गियर बॉक्सजवळ शॉर्ट सर्कीट झाल्यानं ही आग लागली. वेळीच हे लक्षात आल्यामुळं बसचे चालक पी पी जाधव यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि आतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीसांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. त्यानंतर टोईंग वाहनाच्या मदतीने ही बस खोपट आगारात नेण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading