थुंकू नका, थुंकू देऊ नका – ठाणे महापालिकेची विशेष मोहिम

ठाणे महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, गुन्हे शाखा आणि शहरातील काही डॉक्टरांच्या पुढाकारानं सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आणि थुंकू देऊ नका ही विशेष
मोहिम राबवली जाणार असून या मोहिमेचा शुभारंभ उद्या होणार आहे. शहरात राबवण्यात येणा-या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास १२०० रिक्षा चालकांना
सहभागी करून घेतलं जाणार आहे. या रिक्षा चालकांना न थुंकण्याबाबत जनजागृती करणा-या पोस्टरचं वाटप केलं जाणार आहे. प्रबोधनात्मक पोस्टर रिक्षामध्ये लावून
चालकांसह प्रवाशांना देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे. थुंकण्यामुळे पसरणारे जंतू आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी ही मोहिम शहरात राबवली
जाणार आहे. थुंकण्याची सवय बदलण्यासाठी ही चळवळ राबवली जात आहे. ठाण्यातील नामांकीत डॉक्टर मनिष सचदेव, माला सचदेव, क्षयरोग तज्ञ अल्पा दलाल,
डॉ. महेश बेडेकर यांच्या संकल्पनेतून ही मोहिम राबवण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading