ठाण्यातील तीन हात नाका येथे असलेल्या पूलावर काल रात्री एका महिंद्र एक्सेलो गाडीला आग लागली होती. अचानक लागलेल्या या आगीत सुदैवानं कोणतीही जिवितहानी झाली नाही. गाडीतून धूर येत असल्याचं लक्षात येताच चालक गाडीतून बाहेर आल्यामुळं कोणतीही हानी झाली नाही. ही गाडी साजिद अली शेख यांच्या मालकीची असून सरगुरू हा चालक गाडी चालवत होता. तीन हात नाका येथील पूलावर हायवे हॉस्पिटलच्या समोर ही आग लागली होती. महापालिकेच्या अग्निशमन दलानं या ठिकाणी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली.