तीन नायजेरीयन व्यक्तींना साडे सत्तावीस लाखाहून अधिक किंमतीच्या अंमली पदार्थांसह जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश

तीन नायजेरीयन व्यक्तींना साडे सत्तावीस लाखाहून अधिक किंमतीच्या अंमली पदार्थांसह जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. कोरम मॉलजवळ नायजेरियन व्यक्ती कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी ३ नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६० ग्रॅम वजनाचे कोकेन आणि ७० ग्रॅम वजनाची एम डी पावडर असा २७ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ठाणे पोलीसांकडून नववर्ष स्वागत आणि नाताळ सुट्ट्यांमधील पार्टीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading