ठाण्यात तापमानाचा पारा घसरला – कुडकुडणा-या थंडीचा अनुभव

काल रात्रीपासून ठाण्यात तापमानाचा पारा घसरला आहे. आज सकाळी तर चांगलाच गारठा जाणवत होता. गेले दोन दिवस हवेत गारठा जाणवत होता. परंतु काल रात्रीपासून अचानक चांगलाच गारठा वाढला आहे. अगदी दुपारपर्यंत हवेतील गारवा अनुभवायला येत होता. गेल्या दोन दिवसात तापमानामध्ये जवळपास १० अंशाचा फरक पडला असून तापमान सकाळच्या सुमारास १८ अंशाच्या आसपास पहायला मिळत आहे. हवेतील गारठ्यामुळे सकाळी फिरायला जाणा-यांच्या संख्येत घट दिसत असून सध्या स्वेटर, मफलर दिसू लागले आहेत. सकाळी तर गार वारा सुटल्यामुळे कुडकुडणा-या थंडीचा अनुभव ठाणेकरांनी घेतला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading