तिकिट आणि ओळखपत्रावरून झालेल्या वादामध्ये रेल्वे तिकिट तपासनीस जखमी

तिकिट आणि ओळखपत्रावरून झालेल्या वादामध्ये रेल्वे तिकिट तपासनीस जखमी होण्याची घटना दिवा रेल्वे स्थानकात घडली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिवा रेल्वे स्थानकात ओळखपत्रावरून झालेल्या वादात दोन तरूणांनी तिकिट तपासनीसावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. कुणाल शिंदे आणि हर्षल भगत असे हल्ला करणा-यांचे नाव असून सरकारी कर्मचा-यांवर हल्ला केल्यावरून गुन्हा दाखल करून त्यांना पोलीसांनी अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading