मर्सिडीज बेन्झला एका ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक महिला किरकोळ जखमी

नाशिकच्या दिशेने जाणा-या एका मर्सिडीज बेन्झला एका ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. कॅडबरी सिग्नल जवळील उड्डाण पूलावर कोरम मॉलजवळ हा अपघात घडला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणा-या मर्सिडीज बेन्झला बोअरवेल ड्रीलिंग मशिन घेऊन जाणा-या टाटा कंपनीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मर्सिडीज चालवत असलेल्या राखी बरोडीया यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीसांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य केलं आणि मुंबई-नाशिक महामार्ग वाहनांसाठी मोकळा केला. ट्रक चालकाचं नाव समजू शकलं नसून अपघात झाल्यानंतर ट्रक चालक तिथून पळून गेला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading