प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक परांजपे स्कीम्सचा ठाण्यात प्रवेश

महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य स्थानावर असलेल्या परांजपे स्किम्सनं आता ठाण्यात प्रवेश केला असून म्हाडाच्या जमिनीवर ओप्युलस या प्रकल्पाचं उद्या भूमीपूजन होत आहे. अतिशय आधुनिक पध्दतीनं सर्व सुखसोयींचा विचार करून हा प्रकल्प उभारला जात असल्याचं शशांक परांजपे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मागे ५ एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पात सुरूवातीला ८ ते १० लाख रूपयांची सवलत दिली जाणार असून अवघे २ लाख रूपये देऊन सदनिकेसाठी नोंदणी करता येईल असंही शशांक परांजपे यांनी सांगितलं. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या प्रकल्पात सर्व अत्याधुनिक सुखसोयी देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात टू आणि थ्री बीएचके सदनिका सव्वा कोटी रूपये ते १ कोटी ७२ लाख रूपयात उपलब्ध करून देण्यात आल्याचं अमित परांजपे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या सदनिका या कारपेट एरियानं विकल्या जाणार आहेत. या प्रकल्पात ६० हजार लिटर्सचं शास्त्रशुध्द रेन वॉटर हार्वेस्टींग, १ लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. हा प्रकल्प रिचा डेव्हलपर्स बरोबर साकारला जात असून या प्रकल्पाला आवश्यक ते सर्व परवाने मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही शशांक परांजपे यांनी यावेळी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading