अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ

अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून शुक्रवारी करण्यात आला. त्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी बाळकूम अग्निशमन केंद्रात शहीद स्तंभाला अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र फायर सर्व्हीस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई बंदरात १४ एप्रिल, १९४४ रोजी लागलेल्या आगीत ७१ अग्निशमन जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने १४ एप्रिल ते २१ एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विविध आस्थापना, सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतची प्रात्यक्षिके करण्यात येतील. त्याचप्रमाणे विवियाना मॉल येथे प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading