डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पुढच्या वर्षी स्मारकात साजरी केली जाणार – श्रीकांत शिंदे

कल्याण पूर्वेत होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होणार असून पुढील वर्षी बाबासाहेब आंबडेकरांची जयंती स्मारकात अधिक भव्य स्वरूपात साजरी केली जाईल, असे प्रतिपादन कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त कल्याण पूर्व येथील विजय नगर परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कल्याण पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत दोन वर्षांपूर्वी स्मारकाच्या उभारणीचे काम हाती घेतले होते. या स्मारकासाठी उपलब्ध असलेली जागा आरक्षित असल्याने आरक्षणात फेर बदल करणे महत्वाचे होते. यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेऊन आरक्षणात फेर बदल करण्यात आले. तसेच स्मारक अधिक भव्य पद्धतीने उभारावे यासाठी मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्मारकासाठी अतिरिक्त ५ कोटींचा निधी मिळवला होता. एकूण १३ कोटी रूपये खर्चातून उभे राहत असलेले स्मारक आता अंतिम टप्प्यात आले आहे. सर्व नागरिकांनी स्मारकासाठी दाखवलेल्या एकीचा हा विजय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षाची पुढील पिढ्यांना माहिती व्हावी, यासाठी स्मारकाची उभारणी केली आहे. या स्मारकाला भेट देणारा व्यक्ती येथून प्रेरणा, ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन बाहेर पडणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकाच्या रूपाने मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहोत. स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील जयंती स्मारकात साजरी होईल असे श्रीकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading