ज्युपिटर हॉस्पिटलचे गेल्या ६ महिन्यांत तिसरे यशस्वी हृदय प्रत्यारोपण

४३ वर्षीय नसरीन राऊत यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटल येथे हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. महाराष्ट्रातील खोपोली येथील रहिवासी नसरीन यांचे पती ऑटो रिक्षाचालक असून त्यांना तीन मुले आहेत. जेव्हा त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता आणि छातीत धडधड वाढण्याची समस्या वाढायला लागली, तेव्हा त्यांचे हृदय अशक्त झाले आहे हे ऐकून त्यांचे जीवन ठप्प झाले. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्या अरिथमोजेनिक राइट वेंट्रिक्युलर कार्डिओमायोपॅथी (ARVC) नावाच्या अवस्थेने ग्रस्त आहे ज्यामुळे त्यांच्या हृदयाची स्नायूची  भिंत कालांतराने तुटत होती, ज्यामुळे हृदयाचे ठोके असामान्य होत होते. ज्युपिटर हार्ट फेल्युअर टीम डॉ. नितीन बुरकुले आणि डॉ. गौतम रेगे यांनी नसरीनचे हृदय प्रत्यारोपणाची गरज आणि त्याचा फायदा होण्याची शक्यता याबद्दल  कुटुंबियांना कळवले. २६ मार्च रोजी तिचे यशस्वी हृदय प्रत्यारोपण हार्ट सर्जन डॉ. प्रवीण कुलकर्णी आणि डॉ. सौम्या शेखर, भूलतज्ञ डॉ. शैलेश कामखेडकर आणि वैद्य सहाय्यक जॉन थॉमस यांच्या सहाय्याने यशस्वी झाले. शस्त्रक्रियेचा आणि उपचाराचा खर्च कुटुंबाला परवडणारा नसल्यामुळे, ज्युपिटर हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण टीमने टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री निधी यांच्याशी समन्वय साधून त्यांना आर्थिक मदत केली.या शस्त्रक्रियेबद्दल बोलताना ज्युपिटर हॉस्पिटलचे हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपण सर्जन डॉ. प्रवीण कुलकर्णी म्हणाले, “आम्ही दात्याच्या कुटुंबाचे आभार मानतो कारण त्यांच्या दयाळूपणामुळे रुग्णाला जगण्याची दुसरी संधी मिळाली. आम्ही देणगीदारांचे आणि मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीचेही आभारी आहोत ज्यांनी वेळेवर दिलेल्या देणगीमुळे तिचा जीव वाचला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading