भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे शहरातील मुख्य शासकीय इमारती तसेच पूल, पादचारी पूल यांच्यावर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालय, राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, जुना आणि नवीन कळवा खाडी पूल, कोपरी, आनंदनगर पादचारी पूल आदींवर ही रोषणाई करण्यात आली आहे.