जिल्ह्यात आज कोरोनाचे १६२ नवीन रूग्ण

सध्या कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत असून जिल्ह्यात आज कोरोनाचे १६२ नवीन रूग्ण आढळले. तर एकही मृत्यू झाला नाही. सध्या जिल्ह्यात ९९० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात आज ८१ नवीन रूग्ण आढळले तर ४८९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५ नवीन रूग्ण तर ५४ रूग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईमध्ये ४९ नवीन रूग्ण तर २८१ रूग्ण उपचाराधीन आहेत. उल्हासनगर मध्ये ३ नवे रूग्ण तर २४ रूग्ण उपचार घेत आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात १ रूग्ण आढळला तर १० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मीरा-भाईंदर मध्ये १५ नवे रूग्ण आढळले तर ७६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये २ नवे रूग्ण तर ११ रूग्ण उपचाराधीन असून ठाणे ग्रामीण मध्ये ६ नवे रूग्ण आढळले तर ४५ रूग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading