महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, कोलकता अशा देशातील विविध राज्यातून आलेले ३० विद्यार्थी काल मेडीकलचं शिक्षण घेण्यासाठी फिलीपीन्सला रवाना झाले. त्यावेळी मुंबई एअर पोर्टवर केक कापून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. फिलीपिन्स येथील दावू मेडीकल स्कूल फौंडेशन येथे हे विद्यार्थी मेडीकलचं शिक्षण घेण्यासाठी पुढील ५ वर्षांसाठी रवाना झाले. त्यावेळी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन देत त्यांना शुभेच्छा दिल्या.