डीजी ठाणे ॲपला केंद्रीय पातळीवर पुरस्कार जाहीर

इस्त्रायली तंत्रज्ञानावर आधारीत ठाणे महापालिकेच्या डीजी ठाणे या ॲपला बेस्ट डिजीटल सिटी प्रोजेक्ट या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. १० जानेवारीला केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या डीजी ठाणे या ॲपनं उत्कृष्ट कामगिरी केली असून महापालिका आणि स्थानिक नागरिक यांच्यात डीजीटल कनेक्टीव्हीटी निर्माण केली आहे. डीजी ठाणे या डीजीटल प्रणालीकडून डीजी ठाणे माहिती आधारीत नागरिक केंद्रीत प्रशासनासाठी कटिबध्द असलेली यंत्रणा या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आलं होतं. बेस्ट डीजीटल सिटी प्रोजेक्ट या विभागात या प्रकल्पाला विजयी घोषित करण्यात आलं आहे. डीजीटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनांच्या माध्यमातून थेट संवाद साधणा-या ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कार्याचा यानिमित्तानं राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading