ठाण्यामध्ये सनदी लेखापालांच्या एका राष्ट्रीय परिषदेचं आयोजन

ठाण्यामध्ये सनदी लेखापालांच्या एका राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जवळपास ५०० हून अधिक सनदी लेखापाल सहभागी झाले होते. या परिषदेचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रताप दिगावकर यांच्या हस्ते झालं. तसंच सनदी लेखापालांच्या संस्थेचे राष्ट्रीय तसंच पश्चिम विभागीय अध्यक्षही या परिषदेस उपस्थित होते. या परिषदेत आयकर आणि अप्रत्यक्ष कर तसंच नव्यानं लागू करण्यात आलेल्या नवीन कार्यनिती नियमांचा उहापोह आणि चर्चा करण्यात आली. देशातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लेखा परिक्षणाचं महत्व आणि येत्या काळात त्यासाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे बहुआयामी योगदान या परिषदेत अधोरेखित करण्यात आलं. ठाणे विभागीय सनदी लेखापालांच्या संस्थेचे प्रफुल्ल छाजेड यांनी संस्थेच्या सभासद आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आगामी उपक्रमाची माहिती दिली. भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे जगातील प्रगतशील देशातील असाधारण महत्व त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे जम्मू काश्मिर आणि लेह लडाख भागातील विद्यार्थ्यांसाठी आखलेल्या विशेष उपक्रमांची माहिती दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading