डीजी ठाणे प्रणालीनं गाठला १ लाखांचा नोंदणी टप्पा

डीजीटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनांच्या माध्यमातून थेट संवाद साधणा-या ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत डीजी ठाणे या प्रणालीनं एक लाख नोंदणीचा टप्पा पार केला आहे. ठाणेकरांनी डीजी ठाणे हे ॲप डाऊनलोड केलं आहे. त्यामुळं या माध्यमातून डीजी ठाणे ही प्रणाली १ लाख घरात पोहचली आहे. या डीजीटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणेकरांना महापालिकेच्या नव्या वेगळ्या योजनांबरोबरच आणि ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींची माहितीही तात्काळ मिळते. ठाण्यातील नामांकीत दुकानं, हॉटेल्स यांची डिस्काऊंट कूपनही या माध्यमातून दिली जातात. डीजी ठाणेनं अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून यामध्ये विविध प्रकारच्या कार्यशाळा, योग प्रशिक्षण शिबीर, प्रश्नमंजुषा, रक्तदानासारखे उपक्रम, ठाणे यूथ आयकॉन स्पर्धा असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या या उपक्रमांचे स्मार्ट सिटी मुख्याधिका-यांच्या परिषदेतही कौतुक करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading