ठाण्यामध्ये मेथेम्फेटामाइन या अंमली पदार्थाच्या गोळ्या जप्त

ठाण्यामध्ये मेथेम्फेटामाइन या अंमली पदार्थाच्या गोळ्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी जप्त केल्या असून एकाला अटक केली आहे. साकेत रोड येथे एक जण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी गुलजार पाशा या व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याच्या झडतीमध्ये त्याच्याकडे मेथेम्फेटामाइन च्या सव्वा तीन लाखाच्या १२८ गोळ्या मिळाल्या. गुलजार पाशा हा कोपरखैरणे इथे राहत असून या गोळ्या कुणाला विकण्यासाठी तो आला होता याचा पोलीस तपास करत आहेत. ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या पार्ट्यांमध्ये या गोळ्यांचा वापर होणार होता का याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading