कळव्याला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम

कळव्याला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे कळवा आणि आजूबाजूच्या परिसराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास स्टेम प्राधिकरणाकडून कळव्याला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी नादुरूस्त झाली. ही ८१३ मिलीमीटरची जलवाहिनी नादुरूस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला. ही जलवाहिनी दुरूस्त करण्यासाठी व्हॉल्व्ह बंद करण्यात आला आणि दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं. त्यामुळं कळवा आणि आजूबाजूच्या परिसराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading