ठाण्यामध्ये सरस्वती मंदिर ट्रस्टतर्फे बालनगरीचं आयोजन

ठाण्यामध्ये सरस्वती मंदिर ट्रस्टतर्फे बालनगरीचं आयोजन करण्यात आलं आहे. ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दोन दिवशी संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यम तसंच पूर्व प्राथमिक विभागातर्फे बालनगरीचं आयोजन करण्यात आलं आहे. ३ ते ६ वयोगटाच्या मुलांची विकास क्षेत्रं विचारात घेऊन स्थूल स्नायू विकास, सूक्ष्म स्नायू विकास, भाषा, बौध्दीक आणि कलात्मक विकास कृतींची दालनं या बालनगरीत असणार आहेत. मुलांना या दालनांमधून विविध अनुभव दिले जाणार आहेत. स्वकृती आणि खेळामधून मुलांच्या ज्ञानाची रचना मुलं स्वत: करू शकतात याचा प्रत्यक्ष अनुभव या बालनगरीत अनुभवता येणार आहे. या बालनगरीचं उद्घाटन एनसीईआरटीच्या डॉ. रोमिलो सोनी यांच्या हस्ते होणार आहे. सरस्वती मंदिर ट्रस्टच्या क्रीडा संकुलात ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दोन दिवशी ही बालनगरी आयोजित करण्यात आली असल्याचं सुरेंद्र दिघे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading