ठाण्यामध्ये दुर्मिळ अशा हस्तीदंतासह दोघांना अटक

ठाण्यामध्ये दुर्मिळ अशा हस्तीदंतासह दोघांना ठाणे गुन्हे शाखा घटक क्रमांक ६ च्या पथकानं जेरबंद केलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. गायमुख येथून सचिन चौगुले आणि प्रवीण शेरे अशा दोघांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडील ५ लाख रूपये किंमतीच्या हस्तीदंताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २५ लाख रूपये किंमत असल्याचं सांगितलं जातं. या दोघांनी हा हस्तीदंत कुठून आणला आणि ते कोठे आणि कुणाच्या मदतीने विक्री करणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading