महापालिकेच्या सर्व उद्यानात आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचा अभिनव उपक्रम

महापालिकेच्या सर्व उद्यानात आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचा अभिनव उपक्रम महापालिकेनं हाती घेतला आहे. ठाण्याच्या सौंदर्यात भर घालणा-या उद्यानांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळं महापालिकेच्या उद्यानांचं रूप अधिक आकर्षक आणि चमकदार होणार आहे. २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात सर्व प्रभाग समितीअंतर्गत विविध उद्यानांमध्ये विद्युत रोषणाई करण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी काही उद्यानातील विद्युत रोषणाईचं काम पूर्ण झालं असून काही उद्यानातील काम प्रगतीपथावर आहे. तर काही कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत. यापूर्वी उद्यानातील दिवे समाजकंटकांकडून तोडण्यात आल्याच्या घटनांची दखल घेऊन नवे दिवे लावत असताना याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. विशेष आरेखन तसंच उद्यानांच्या हिरवाईला अनुरूप रंगसंगतीचे खांब लावण्यात येत असून आकर्षक प्रकाश व्यवस्थेसाठी उर्जा कार्यक्षम एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येत आहे. प्रमोद महाजन निसर्ग उद्यान, हिरानंदानी मिडोज येथील महापालिकेचं उद्यान तसंच इतर काही उद्यानांमध्ये विद्युत रोषणाईची कामं पूर्ण झाली असल्यामुळं या उद्यानांचं रूपडं पालटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading