ठाण्यात ९ ते १५ जानेवारी दरम्यान रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं आयोजन

ठाण्यात दरवर्षी प्रमाणे रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. ९ ते १५ जानेवारी दरम्यान ही व्याख्यानमाला होणार असून ९ जानेवारीला राजकीय विश्लेषक प्राध्यापक संगीत रागी यांचं आझादी का अमृत महोत्सव या विषयावर व्याख्यान होणार आहे. १० जानेवारीला डायबेटीस अपाय आणि उपाय या विषयावर डॉ. तुषार रेगे, ११ जानेवारीला आव्हान स्पर्धा परीक्षांचे या विषयावर प्रा. नरेशचंद्र काठोळे, १२ जानेवारीला सुप्रसिध्द गायक राहुल देशपांडे यांची प्रकट मुलाखत, १३ जानेवारीला संसदीय अधिकार कक्षा आणि अवमानता अधिकार या विषयावर निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत, १४ जानेवारीला दीपस्तंभ आधार निराधारांचा या विषयावर यजुर्वेद महाजन तर १५ जानेवारीला उज्ज्वल इतिहास से अमृतकाल की ओर या विषयावर सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेचं हे ३७वं वर्ष असून सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणावर रोज रात्री ८.१५ वाजता व्याख्यानं होणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading