क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन घटना उघडकीस

क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. अंबरनाथमध्ये राहणारे अब्राहम कुनात्रा यांची क्रेडीट कार्डद्वारे २ लाख ९६ हजारांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं. कुनात्रा यांचे अॅक्सीस बँकेचे क्रेडीट कार्ड असून अॅक्टीव्हेशन प्रोसीजरसाठी अॅपचा वापर करत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना टेक्स्ट मेसेजद्वारे ओटीपी विचारून त्यांच्या खात्यातून २ लाख ९६ हजारांची रक्कम काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. तर दुस-या एका घटनेत उल्हासनगरमधील एका केबल व्यावसायिकाची क्रेडीट कार्डद्वारे दीड लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. उल्हासनगरमधील केबल चालक हिरालाल पंजवानी यांच्या स्टेट बँक आणि कोटक महिंद्र बँकेच्या क्रेडीट कार्डमधून अज्ञात व्यक्तीने १ लाख ६१ हजारांची रक्कम पेटीएम आणि वन मोबोक्वीक या अॅपद्वारे परस्पर ऑनलाईन व्यवहार करून काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. याबाबत पंजवानी यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हेशाखेच्या पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading