प्रभात फिल्म सोसायटी चे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे आज निधन झाले.
ते ८४ वर्षांचे होते. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. माजिवडा येथे ते राहत होते. मुंबईत मामी फिल्म फेस्टिवल सुरु करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उदया आयंसंस्कार होणार आहेत.