ठाण्यात विवाहितेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

राबोडी, साकेत परिसरात पोलीस परेड ग्राऊंडजवळील पदपथावर एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर राबोडी येथील रेश्मा अन्सारी असं या महिलेचं नाव असून धारदार शस्त्राने गळा चिरून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत राबोडी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हत्येचे कारण समोर आले नसले तरी मृत विवाहितेची ओळख पटल्यांनंतर तिच्या पती आणि दोन मुलांसह परिचितांकडे चौकशी सुरू आहे अशी माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading