ठाण्यात राहणा-या निवृत्त लेफ्टनंट कर्नलची फसवणूक

ठाण्यात राहणा-या एका निवृत्त लेफ्टनंट कर्नलला त्याच्या सहका-याच्या नावानं व्हॉटस् ॲप संदेश पाठवून ४० हजारांची रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आला आहे. पातलीपाडा येथील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणारे सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल विनोदकुमार अडुकिया यांना ६ डिसेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर व्हॉटस् ॲप संदेश आला. या संदेशात मी कर्नल हरपाल सिंग सिरोही असून पत्नीसह सॅनफ्रान्सिस्कोला आलो आहे. तिथे पत्नीच्या बहिणीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. पण अमेरिकेत रक्कम ट्रान्सफर करण्यास अडथळे येत असल्यानं संदेशात दिलेल्या नंबरवर रक्कम पाठवण्याचं म्हटलं होतं. त्यानुसार शितलसिंग नामक आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर ४० हजारांची रक्कम अडुकिया यांनी ट्रान्सफर केली. पुन्हा काही वेळानं २० हजारांची रक्कम पाठवण्याची मागणी करण्यात आली. मात्र विनोदकुमार यांनी खात्यात पैसे नसल्याचं सांगून असमर्थता दर्शवली. त्यावेळी अडुकिया यांनी थेट कर्नल सिरोही यांना फोन लावला. त्यावेळी आपण अमेरिकेत नसून पंजाबमधील फरिदकोट येथे पोस्टींगला असल्याचं सांगितलं. त्यावेळी अडुकिया यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी २१ डिसेंबरला कासारवडवली पोलीसांकडे तक्रार दाखल केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading