ठाणे महापालिकेच्या दर्शनी भागावरचे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्पचित्र नव्या स्वरूपात पहायला मिळणार

ठाणे महापालिकेच्या दर्शनी भागावर असणारे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्पचित्र आता ठाणेकरांना नव्या स्वरूपात पहायला मिळणार आहे. काल हे शिल्पचित्र कसे असावे याविषयी मागवण्यात आलेल्या संकल्प चित्रांचे सादरीकरण महापौरांसमोर झाले त्यावेळी महापौरांनी ही माहिती दिली. ठाणे महापालिका मुख्यालयावर असलेले शिल्पचित्र जुने असून त्याची डागडुजी करण्याची मागणी होत होती. त्यानुसार महापौरांनी यासाठी संकल्पचित्राचे सादरीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रस्तावित संकल्पचित्राचे सादरीकरण महापौरांसमोर झाले. मेसर्स पेन्सिल, आर एस कंस्ट्रक्शन आणि गार्नेट इंटेरियर्सच्या माध्यमातून हे सादरीकरण करण्यात आलं. या तिन्ही कंपन्यांनी नाविन्यपूर्ण अशा संकल्पचित्राचे सादरीकरण केलं. या संकल्पचित्रांचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाणार असून येत्या काही महिन्यात महापालिका भवनामध्ये नव्या स्वरूपातील शिवाजी महाराजांचा इतिहास साकारला जाईल असं महापौरांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading