ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याला मारहाण

ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात राहणारे भाजपाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांना मारहाण झाली. या भागात फलक बसवण्याच्या कारणावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. त्यानंतर काल संध्याकाळी १५-२० जणांच्या जमावाने प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. जाधव यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या प्रकारानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून हीच का बाळासाहेबांची शिकवण असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे. हा प्रकार विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसंच भारतीय जनता महिला मोर्चानेही निषेध रेपाळे-भोसले, दोस्ती को दोस्ती मार को मार, लहू को लहू से जवाब असा संदेश ट्वीटरवरून प्रसारीत केला आहे. त्यामुळे हा वाद आणखी उफाळून येतो का याची चर्चा सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading