लोढा आयटी पार्क ते विवियाना मॉल मार्गावरील वाहतुकीत बदल

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चिराग नगर येथील लोढा आयटी पार्क जवळील कल्व्हर्टचे रूंदीकरणाचे कामामुळे 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 06.00 ते दि. 15 मे 2023 रोजी  रात्री 23.00 वाजे पर्यंत लोढा आयटी पार्क व विवियाना मॉल मागील गेटचे दिशेने जाणारा रोड बंद करण्यात आला असून या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

          प्रवेश बंद – (1) लोढा आयटी पार्क व विवियाना मॉल मागील गेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टी.सी.एस. येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

       पर्यायी मार्ग – सदरची वाहने टी.सी.एस., वसंत लॉन्स, हरदास नगर, ज्युपिटर हॉस्पिटल, विवियाना मॉल सर्व्हिस रोड, उत्सव हॉटेल मार्गे इच्छीत स्थळी जातील.

          प्रवेश बंद – 2) टी.सी.एस. व पोखरण रोड नं.02 कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लोढा आयटी पार्क येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

          पर्यायी मार्ग – सदरची वाहने उत्सव हॉटेल, विवियाना मॉल सर्व्हिस रोड, ज्युपिटर हॉस्पिटल, हरदास नगर, वसंत लॉन्स मार्गे इच्छीत स्थळी जातील.

          ही वाहतूक अधिसुचना दि. 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 06.00 ते दि. 15 मे 2023 रोजी  रात्री 23.00 वाजे पर्यंत अंमलात राहील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading