ठाणे पोलीसांच्या ऑल आऊट कोंबिंग मोहिमेत १६६ आरोपींना अटक

गुन्हेगारी कृत्याला आळा बसण्याकरिता ठाणे पोलीसांतर्फे काल ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दंडात्मक कारवाई करून ११ लाखाहून अधिक रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला तर १६६ आरोपींना अटक करण्यात आली. या ऑपरेशन दरम्यान अवैध शस्त्र, अग्निशस्त्रे जप्ती, फरारी आरोपीला अटक करणे, हॉटेल, लॉजेस, डान्सबार तपासणे, पब, हुक्का पार्लर, पॅरोल आदेशाचे उल्लंघन करणा-यांचा शोध घेणे, वाहन तपासणी, मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांवर कारवाई, झोपडपट्ट्या आणि संवेदनशील ठिकाणची तपासणी आणि सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात ही मोहिम राबवण्यात आली. या कारवाईत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये १६६ आरोपींना अटक करण्यात आली. तसंच ठाणे वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईत २ हजार ८५१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजार ७९० वाहन चालकांविरूध्द वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करून ११ लाख ६३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading