ठाण्यात पोलिसांनाच सायबर झटका

अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणा-या पोलिसांना आता सायबर गुन्हेगारीचा झटका बसला आहे. गेल्या काही काळात ठाणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फेसबुक खाते सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याची घटना ताजी असतानाच नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे फेसबुक हॅक करून रक्कम उकळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ निरिक्षक अनिल मांगले यांच्या फेसबुकवरून अज्ञात भामटयाने काही रक्कम ऑनलाईन पाठवण्याची विनंती करणारा मेसेज बुधवारी पाठवला. अचानक पैशांची निकड का लागली, याचे क्षेमकुशल विचारण्यासाठी मित्राने मांगले यांना फोन केल्याने अकाऊंट हॅक झाल्याचे आढळल्याची माहिती स्वतः मांगले यांनी दिली. दरम्यान अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे येत असुन या भामट्यांची मजल आता पोलिसांचे फेसबुक खाते हॅक करण्यापर्यंत गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading